लाच देण्यासाठी पैसा नाही, तर खरगपूर तहसीलदारापुढे बांधली म्हैस

टीकमगढ (मध्य प्रदेश): मुन्नाभाई चित्रपटात शोभावा असा प्रकार मध्य प्रदेशातील टीकमगढ येथे झाला आहे. तहसीलदाराच्या लाचखोरीने त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने घरातील दुभती म्हैस आणून तहसीलदाराच्या जीपला बांधली. आणि नेमके त्याच वेळी एसडीएम (सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट) वंदना सिंह रजपूत आणि तेथे पोहचल्या.

देवपूर येथील लक्ष्मी यादव जमिनीए नामांतर आणि वाटणी यासाठी गेले वर्षभर झटत होता. त्याच्याकडे 1 लाख रुपये लांच मागण्यात आली. कसेबसे त्याने 50 हजार रुपये जमा करून दिले. पण तरी काम होईना, तेव्हा त्याने घरातील दुभती म्हैस तहसीलदार कार्यालयात नेऊन तहसीलदाराच्या जीपला बांधली. ते पाहून तहसीलदारही थक्क झाला. पण नेमके त्याच वेळी सब डिव्हिजिनल मॅजिस्ट्रेट तेथे पोहचले. बलदेवगढ सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट वंदना सिंह रजपूत आणि ठाणे प्रभारी धर्न्मेंद्र यादव यांनी लक्ष्मी यादवला निष्पक्षपाती तपासाचे आश्‍वासन दिलेआहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लक्ष्मी यादवची फाईल सहा महिन्यांपूर्वीच तहसीलदार साहेबाकडे दिली होती. मात्र तहसीलदाराने जमिनीची वाटणी आणि नावातील बदल नोंद करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)