मोदींकडून मुलाखतीत वस्तुस्थितीचा उल्लेख नाही : कॉंग्रेस

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखतीत वस्तुस्थितीचा उल्लेख केला नाही, असे टीकास्त्र कॉंग्रेसने सोडले. जनतेला दिलेल्या आश्‍वासनांबाबत मोदींना कुठली चिंता वाटत नसल्याचे मुलाखतीतून स्पष्ट झाले, असेही त्या पक्षाने म्हटले.
देशाच्या जनतेला नोटाबंदी, वस्तू आणि सेवा करामुळे (जीएसटी) अनेक यातना भोगाव्या लागल्या. त्याविषयी मोदींनी बोलायला हवे होते. बॅंक घोटाळा, काळा पैसा, राष्ट्रीय सुरक्षा, शेतकऱ्यांचे प्रश्‍न, महागाई आदींबाबत ते काहीच बोलले नाहीत, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी दिली.

तर निश्‍चित केलेल्या मुलाखतीच्या माध्यमातून जनतेला फसवले जाऊ शकत नाही, असे म्हणत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी मोदींना संसद आणि पत्रकार परिषदेला सामोरे जाण्याचे आव्हान दिले. मोदींनी नववर्षाच्या प्रारंभीही खोटी आश्‍वासने देण्यापासून जनतेला सोडले नाही, असे शर्मा यांनी म्हटले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, मोदींनी अनेक मुद्‌द्‌यांवर भाष्य करत व्यापक मुलाखत दिली. त्यातून त्यांनी सरकारची कामगिरी डागळण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांचा अजेंडा मोडून काढला, अशी प्रतिक्रिया भाजपने दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)