निवडणुकीत भाजपचे घोषणापत्र नसते तर वचननामा असतो – पंकजा मुंडे

नरेंद्र मोदी हे गरीबांचे जाण असणारे नेते

(मध्यप्रदेश) इंदौर: काॅग्रेस हा मावळतीला आलेला पक्ष आहे, त्यांच्याकडे भाजपवर टिका करण्याशिवाय दुसरा कोणताही अजेंडा नाही. मध्यप्रदेशात पुन्हा भाजपचेच सरकार येणार आहे, शिवराजसिंह चौहान यांचा विजय रथ कुणीही रोखू शकणार नाही. त्यांच्या शिवराज नावांत शिवाची शक्ती आणि जनतेच्या मनावर राज करण्याची किमया आहे. जनतेचे सुख त्यांना महत्वाचे आहे. असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला त्या काल (मध्यप्रेदेश) इंदौर मध्ये प्रचारसभेत बोलत होत्या.

मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी उज्जैन दक्षिण विधानसभा मतदारसंघात प्रचार सभा घेण्यात येत आहेत. भाजपने प्रचारक म्हणून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर जबादारी सोपवली आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या, निवडणुकीत भाजपचे घोषणापत्र नसते तर वचननामा असतो, जनतेला दिलेल्या वचनाची पुर्ती त्यांनी केली आहे. नरेंद्र मोदी हे गरीबांचे जाण असणारे नेते आहेत, त्यांनी गरिबी अनुभवली आहे त्यामुळेच त्यांनी महिलांसाठी उज्ज्वला गॅस सारखी योजना आणली. मध्यप्रदेश सरकारच्या लाडली लक्ष्मी योजनेचा आदर्श घेवूनच आम्ही महाराष्ट्रात माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली. सतत तीन टर्म भाजपचे सरकार असल्याने मध्यप्रदेश आज प्रगत राज्य बनले आहे लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यतच्या अनेक योजना सरकारने यशस्वीपणे राबवल्या आहेत, त्यामुळे भाजप सरकारलाच पुन्हा सत्तेवर बसविण्याची जबाबदारी तुमची आहे त्यासाठी कमळाच्या समोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने भाजपचे उमेदवार विजयी करा असे आवाहन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
2 :joy:
0 :heart_eyes:
2 :blush:
3 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)