मराठा अशी कोणतीही स्वतंत्र जात नाही : मागासवर्ग आयोगाचा अहवालातील निष्कर्श

File photo

कुणबी ओबीसीत समावेश असल्याने मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे

आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृट्या मराठा समाज मागासलेला

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुंबई : मराठा समाज हा आर्थिक, सामाजीक आणि शैक्षणिक दृट्या मराठा समाज मागासलेला असून गेल्या अनेक वषारपासून आरक्षणाच्या लाभांपासून वंचित आहे. मुळात “मराठा’ ही कोणी वेगळी जात नसून हा समाज “कुणबी’ जातीतच मोडतो. कुणबी समाजाला ओबीसी वर्गात आरक्षण देण्यात आलेले आहे. त्यामुळे मराठा समाजालाही आरक्षण मिळावे ही त्यांची गेल्या अनेक वर्षांची मागणी रास्त आहे. असे निरीक्षण नोंदवत राज्य मागास प्रवर्ग आयोगाने मराठा समाजाला 16 टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याची शिफारस राज्य सरकारकडे सादर केलेल्या अहवालात केली आहे.

एप्रिल 1942 मध्ये तात्कालीन सरकारने मराठा समाजाचाही मागास वर्गात समावेश केला होता. त्यानुसार त्यावर्षी शैक्षणिक क्षेत्रात मराठा समाजालाही पहिल्यांदा आरक्षण देण्यात आले. मात्र केंद्र सरकारने 1950 मध्ये त्यावेळी देशातील अनुसूचित जाती जमातींची नव्याने यादी तयार केली. त्यावेळी मराठा ही जात गायब झाली.

पुढे साल 1966 मध्ये केंद्र सरकारने या यादीत जेव्हा पुन्हा सुधारणा केली, तेव्हा कुणबी जातीचाही ओबीसींमध्ये समावेश केला. मराठा आणि कुणबी वेगळ्या जाती नाहीत. कुणबी समाजाला आधीपासून इतर मागासवर्गीय (ओबीसी)मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. म्हणून मराठा देखील खूप पूर्वीच्या वर्गाच्या श्रेणीत असल्याने आयोगाने मराठा समाजाचा मागासलेपणा, शैक्षणिक,आर्थिक आणि सामाजिक या चार मुद्यावर मराठा समाज हा देखील मागास असल्याचा निर्ष्कष आपल्या अहवालात काढला आहे.

* 77 ट मराठा समाज शेतकरी आणि शेतमजूर
राज्यात कोणत्याही जातीनिहाय सर्व्हे करण्यात आला नाही. राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी 32 टक्के हा मराठा समाज आहे. त्यापैकी शेती आणि शेतमजूरीमध्ये सुमारे 77 टक्के मराठा समाज असून सरकारी नोकऱ्यांमध्ये केवळ 6 टक्के आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाचे प्रमाण नगण्य असेच आहे. या समाजामध्ये शरमेपोटी शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणा आहे. ग्रामीण भागात उद्योगधंदे नसल्याने हा समाज शहरी भागात आलेला आहे. 70 टक्के मराठा
कुटूंबीय कच्च्या घरात रहातात. त्यापैकी 37 टक्के समाज हा शेतवस्तीत तर 5 टक्के समाज आजही बेघर असल्याचे अहवालात नमुद केले आहे.

*आत्महत्येत मराठा समाज
2013 ते 2018 दरम्यान राज्यात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या संदर्भात आयोगाने सुमारे 40 हजार 942 कुटुंबांचा सव्हे केला. त्यात 340 आत्महत्यांपैकी 277 आत्महत्या या मराठा समाजातील शेतकऱ्यांनी केल्या होत्या. आकडेवारीनुसार 23.56 टक्के मराठा समाजातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. तर कुणबी समाजातील 19.34 टक्‍के शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ आल्यामुळे या समाजाची बिकट अवस्था समोर येते असे या अहवालात स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)