तामिळनाडुच्या अर्थसंकल्पात करवाढ नाही

चेन्नाई: तामिळनाडुचा नवीन आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. यात कोणतीही नवीन करवाढ करण्यात आलेली नाही. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री ओ पनीरसेल्वम यांनी हा अर्थ संकल्प सादर केला. या अर्थ संकल्पात 14 हजार 300 कोटी रूपयांची महसुली तूट आहे. दोन हजार कोटी रूपये खर्चाचा पार्किंग मॅनेजमेंट प्रकल्प हे या अर्थसंकल्पाचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे.

चेन्नाई शहरातील पार्किंगचा प्रश्‍न सोडवण्यासाठी ही व्यापक उपाययोजना केली जात आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात असलेली ही महसुली तूट कशी भरून काढणार हा एक महत्वाचा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे त्यावर उत्तर देताना राज्य सरकारने म्हटले आहे की महसुली उत्पन्न वाढीच्या अनेक योजना आम्ही राबवणार आहोत. त्यातून ही तूट भरून काढली जाईल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)