वर्मा यांच्या विरोधात पुरावा नाही : पटनाईक

नवी दिल्ली: सीबीआयचे माजी प्रमुख अलोक वर्मा यांच्यावर करण्यात आलेली कारवाई अत्यंत घिसाडघाईची होती त्यांच्या विरोधात कोणताही सबळ पुरावा नसताना त्यांना या पदावरून घालवून देण्यात आले आहे अशी टीका सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती ए. के. पटनाईक यांनी केली आहे. केंद्रीय दक्षता आयोगाने वर्मा यांची जी चौकशी केली त्या चौकशीचा मॉनिटरिंग करण्याचे काम पटनाईक हे करीत होते.

आज त्यांनी या साऱ्या प्रकरणावर मतप्रदर्शन करताना वरील प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले की दक्षता आयोगाने वर्मा यांच्या बाबतीत जे काही निष्कर्ष दिले आहेत ते माझे निष्कर्ष नाहीत. ते म्हणाले की दक्षता आयोगाचे निष्कर्ष म्हणून जे काही निष्कर्ष माझ्या समोर सादर करण्यात आले होते त्यावर सीबीआयचे विशेष संचालक राकेश आस्थाना यांची स्वाक्षरी होती व स्वता वर्मा यांना दक्षता आयोगापुढे आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली नाही असेही न्या पटनाईक यांनी नमूद केले आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)