मोदींची सीबीआय आणि ममतांच्या सीआयडीत फरक नाही : अधीर रंजन चौधरी

कोलकाता  – मोदींची सीबीआय आणि पश्‍चिम बंगाल मध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची सीआयडी यांच्यात काही फरक नाही, दोघेही आपल्या राजकीय हितासाठी या यंत्रणांचा गैरवापर करीत आहेत अशी टीका कॉंग्रेस नेते खासदार अधिर रंजन चौधरी यांनी केली आहे. मोदींच्या राफेल गैरव्यवहार प्रकरणात ममता बॅनर्जी मुग गिळून का गप्प आहेत असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले की राफेल प्रकरणात आता सर्वच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे पण ममता बॅनर्जी मात्र का गप्प आहेत हे मात्र अजून समजलेले नाही.

ते म्हणाले की केंद्र सरकारी पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जसे सीबीआयचा आपल्या व्यक्तीगत हितासाठी वापर करतात तसाच वापर पश्‍चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी यांनी सीआयडी या यंत्रणेचा चालवला आहे. ममतांनी मोदींच्या विरोधात राजकीय आघाडी उठवल्याचे भासवले असले तरी आता मात्र त्या मोदींच्या राफेल प्रकरणाविषयी जाणिवपुर्वक मौन पाळून आहेत. त्यांना नराडा आणि शारदा घोटाळ्याच्या चौकशीची भीती वाटते आहे काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अगदी अलिकडे ममता बॅनर्जी यांनी सीबीआय ही संस्था बीबीआय म्हणजेच बीजेपी ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेशन अशी संस्था झाली असल्याची प्रतिक्रीया ट्‌विटरवर टाकली होती. त्या अनुषंगाने त्यांनी ही टीका केली. केवळ एखाद्या ओळीची प्रतिक्रीया देऊन ममतांनी गप्प बसणे योग्य नाही. त्यांनी महत्वाच्या विषयांवरील आपली भूमिका तपशीलाने स्पष्ट केली पाहिजे असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)