पंजाबमध्येही आपसोबत कॉंग्रेसची आघाडी नाही

चंदीगढ – लोकसभा निवडणुकीकरता पंजाबच्या सर्व मतदारसंघांमध्ये कॉंग्रेस उमेदवार उभे करणार आहे. आप किंवा अन्य कोणत्याही पक्षासोबत आघाडी करणार नसल्याची घोषणा पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केली आहे.

आप संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमध्ये आघाडीसाठी कॉंग्रेससोबत चर्चा सुरू असल्याचा दावा केला होता. केजरीवाल किंवा अन्य कोणत्याही पक्षाच्या नेत्याशी आघाडीबद्दल चर्चा सुरू नाही. आम्ही स्वबळावर निवडणूक लढवून विजयी होणार आहोत, असे अमरिंदर यांनी स्पष्ट केले.

केजरीवाल यांनी मंगळवारी दिल्लीतील 7 जागांवर आप विजयी होणार असल्याचा दावा केला आहे. पंजाबमध्ये लोकसभेच्या 13 जागा आहेत. 2014 च्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला 4, कॉंग्रेसला 3, अकाली दलाला 4 आणि भाजपला एका ठिकाणी विजय मिळाला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)