लातूर लोकसभासाठी एकही अर्ज नाही

लातूर – लातूर लोकसभा आरक्षीत मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल करावयाचा आज तिसरा दिवस होता. या तीन दिवसांत अद्याप एकाही उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. मात्र, तिसऱ्या दिवशी 15 व्यक्तींनी 44 अर्ज नेले आहेत.

लातूर लोकसभा मतदार संघासाठी पहिल्या टप्प्यात 18 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी 19 मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. पहिल्या दोन दिवसांत एकानेही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. 21 मार्च रोजी सार्वजनिक सुटी होती. आज तिसऱ्या दिवशीही एकही उमेदवारी अर्ज आला नाही. मात्र, आजच्या तिसऱ्या दिवशी अरूण सोनटक्के, पपीता रावसाहेब रणदिवे, विकास सोनवणे, नरेंद्र बाबाराव गायकवाड, सुनील ज्ञानोबा दांडगे, मिलिंद महालिंगे, धर्माजी सोनकवडे, उपाडे बंददगडू, प्रा. व्यंकटेश कसबे, जितेंद्र बनसोडे, अरविंद विश्‍वनाथ कांबळे, रूपेश शंके, दत्ता प्रभाकर करंजीकर, ऍड. मधुकर काशीनाथ कांबळे व फकिरा जोगदंड यांच्या नावे 44 अर्ज नेण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी 38, दुसऱ्या दिवशी 41 तर आज 44 असे लातूर लोकसभा मतदार संघासाठी संभाव्य उमेदवारांच्या नावे अर्ज नेण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)