फटाक्यांविषयीच्या निर्देशांचे पालन नाहीच

सर्व स्तरांतून  जनजागृतीची गरज : रात्री 8 ते 10 या वेळेच्या नियमाकडे दुर्लक्ष

पुणे – केवळ रात्री 8 ते 10 या वेळेतच फटाके वाजवावेत. याशिवाय इतर वेळेत वाजवू नये, अशा सर्वोच्च न्यायालायने दिलेल्या निर्णयाचे पालन पुणेकरांनी केलेले नाही. विशेष म्हणजे या नियमावलीबाबत अनेक नागरिकांना माहित नसल्याचे दिसून येत आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र, राज्य सरकारने विद्यार्थी, त्यांचे पालक आणि नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती करणे आवश्‍यक असल्यांची मते कायदे तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिवाळीत वाजविल्या जाणाऱ्या फटाक्‍यामुळे ध्वनी, वायू प्रदूषण होते. ज्येष्ठ, आजारी नागरिकांना त्रास होतो. या पार्श्‍वभूमीवर रात्री 8 ते 10 या वेळेत फटाके वाजविण्यास सर्वोच्च न्यायालयाने नागरिकांना परवानगी दिली होती. या व्यतिरिक्त इतर वेळेत फटाके वाजवू नये, असे निर्देश दिले होते. मात्र, या निर्देशाचे पालन होताना दिसून येत नाही. पुणे शहरासह उपनगर भागात पहाटेपासून फटाके वाजविण्यास सुरूवात होते. दिवसभर तुरळक प्रमाणात शहरात फटाके वाजत असतात. संध्याकाळी त्यामध्ये वाढ होते. शहर, उपनगरात फटाके उडविल्याचे आवाज येतात. तर कित्येक ठिकाणी रात्री दहानंतरही फटाके वाजविण्यास येत असतात. यावरून नागरिकांकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे.

पोलीस प्रशासनावर मूळातच फार मोठा ताण आहे. सुरक्षा व्यवस्था आणि इतर कामकाज त्यांना असते. लोकसंख्येच्या मानाने पोलिसांची संख्या कमी आहे. पोलीस यंत्रणा तोकडी आहे. या निर्णयाच्या अंमलबाजवणीसाठी सक्षम व्यवस्था निर्माण करणे गरजेचे होते. त्यासाठी जनजागृती आवश्‍यक आहे. शाळा-कॉलेज या ठिकाणाहून विद्यार्थ्यांमध्ये जागृती केली जातेच. पण, त्याच बरोबर निमशासकीय, स्वयंसेवी संस्थांनी प्रबोधन करणे गरजेचे होते. असे केले असते, तर या आदेशाची अधिक प्रमाणात अंमलबजावणी झाली असती.
– ऍड. प्रमोद बोबटकर, अतिरिक्त सरकारी वकील.

पूर्वीच्या तुलनेत फटाक्‍यांची विक्री कमी झालेली आहे. अलिकडच्या काळात तरुणाईला पर्यावरणाचे महत्त्व कळू लागले आहे. त्यामुळे ते कमी प्रमाणात फटाके उडवितात. शहरातील उच्चभ्र भागात तर अतिशय नगण्य प्रमाणात फटाके वाजविण्यात आले. इतर ठिकाणीही सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाचे बऱ्यापैकी पालन होत आहे. मात्र, काही ठिकाणी, काही लोकांनी याचे पालन केले नसेलही, पण जागृती केल्यानंतर तेही नियमांचे पालन करतील. हळूहळू हे चित्र बदलेल.
– ऍड. हेमंत झंजाड, माजी उपाध्यक्ष, पुणे जिल्हा बार असोसिएशन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)