भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुरू, महाराष्ट्रातील उमेदवारांबाबत देखील होणार चर्चा

दिल्ली : निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले असून देशभरामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सत्ताधारी भाजपने देखील आगामी लोकसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी केली असून आज भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक दिल्ली येथे सुरू झाली आहे. या बैठकीसाठी सुषमा स्वराज, किरण रज्जू, शिवराज सिंह चौहान, अरुण जेटली, राजनाथ सिंह या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी हजेरी लावली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीद्वारे आज बिहार, उत्तराखंड, आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, अंदमान-निकोबार या राज्यांमधील पक्षाच्या लोकसभा निवडणुकांमधील उमेदवारांबाबत चर्चा केली जाणार आहे. या बैठकीद्वारे सदर राज्यांमधील लोकसभा निवडणुकांमधील काही उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब देखील केले जाऊ शकते.

-Ads-

पक्षाच्या आजच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा उमेदवारांबाबत देखील चर्चा होणार असून आज पक्षातील ज्येष्ठ नेत्यांतर्फे महाराष्ट्रातून कोणा-कोणाच्या नावांवर शिक्कामोर्तब केले जाईल याबाबत भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये कमालीचे औत्सुक्य निर्माण झाले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)