अबब! भारतात आहेत एकूण ‘एवढे’ राजकीय पक्ष 

नवी दिल्ली : भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचे मानले जाते. लोकशाहीचा अविभाज्य अंग असणाऱ्या निवडणुकांदरम्यान तर भारतामध्ये एखाद्या उत्सवाप्रमाणे वातावरण असते. या लोकशाहीच्या उत्सवामध्ये देशभरातील विविध लहान-मोठे पक्ष आपला विचार जनतेसमोर मांडत आपलं नशीब आजमावताना दिसतात. १२५ करोडहून अधिक लोकसंख्या असलेल्या या भारतदेशामधील राजकीय पक्षांची संख्या देखील तशी भरमसाठचं आहे.

निवडणूक आयोगाने नुकतीच भारतातील राजकीय पक्षांची आकडेवारी जाहीर केली असून देशातील राजकीय पक्षांची संख्या वाचून तुम्ही देखील अचंबित व्हाल. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशभरामध्ये सध्या २२९३ नोंदणीकृत पक्ष असून त्यांपैकी १४९ राजकीय पक्षांनी या वर्षी जानेवारी ते मार्च महिन्यादरम्यान नोंदणी करून घेतली आहे.

भारतामध्ये सध्या निवडणूक आयोगातर्फे अधिकृत असे ७ राष्ट्रीय व ५९ राज्यस्थरीय पक्ष आहेत. जवळपास ३००० राजकीय पक्षांपैकी अनेक पक्षांची नावे राष्ट्रीय साफ नीती पार्टी, सबसे बडी पार्टी, भरोसा पार्टी अशी अजब गजब आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)