इडुक्की रेस्टॉरंटमध्ये अडकले ६९पर्यटक, त्यात २० परदेशी पर्यटक

केरळला अतिवृष्टीचा चांगलाच तडाखा बसला आहे. अतिवृष्टीमुळे केरळमधील धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून तब्बल २४ धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. शिवाय आशिया खंडातील सर्वात मोठे धरण इडुक्की हेही भरले असून २६ वर्षानंतर यामधून पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे नद्या दुथडी भरून वाहत असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले आहे.
एनडीआरएफच्या तुकड्या, आर्मी, आणि नेव्ही या सैन्यदलाच्या तुकड्यांच्या मदतीने या नैसर्गीक आपत्तीतून बचावकार्य चालू आहे. इडुक्की येथील लोकप्रिय हिल स्टेशन मुन्नार येथील एका रेस्टॉरंटमध्ये ६९ पर्यटक अडकलेले असून त्यात २० परदेशी पर्यटक आहेत. इडुक्की धरणाच्या पातळीने २४,००० फूटचा आकडा ओलांडल्याने या धरणाचे चेरिथुनी  येथील आणखी दोन दरवाजे खुले करण्यात आलले आहेत. ऊर्जा मंत्री एमएम मनी यांनी सांगितले की, धरणाचे दरवाजे काही तासांसाठी उघडण्यात आले असल्याने नागरिकांनी घाबरण्याचे काही कारण नाही.
कोची येथील आंतरराष्ट्रीय विमानतळात पाणी शिरू शकते त्यामुळे कोची विमानतळावरील सर्व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे काही तासांसाठी रद्द करण्यात आली आहेत. जवळपास १० हजारांहून अधिक नागरिकांना मदत शिबिरामध्ये पाठविण्यात आले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)