“स्वामिनी’त साड्यांचे 33 दुर्मिळ पॅटर्न उपलब्ध

पुणे – साड्यांमध्ये जितके प्रकार आणि ब्रॅंड आहेत, तितके दुसऱ्या कोणत्या क्षेत्रात असतील असे वाटत नाही. माहेश्‍वरी, कांजीवरम, पोचमपल्ली, बनारसी सिल्क, पैठणी, क्रेप असे कितीतरी प्रकार आणि कितीतरी डिझाईन्सचे पॅटर्न! पण या साड्यांना नात्यांची गुंफण देऊन त्यातून आपुलकी वाढवण्याचे काम फक्‍त पुण्यातील स्वामिनी या साड्यांच्या महाराणीने केले आहे.

याविषयी स्वामिनीचे संचालक रियाझभाई शेख यांनी सांगितले की, माता-भगिनींना आवडणाऱ्या साड्या तर इतरांप्रमाणे आम्हीही विकतो पण त्यात पैशाच्या व्यवहारापेक्षा माणुसकीच्या नात्याला मी जास्त मानतो. जयाप्रदा, हेमामालिनी, लतादीदी मंगेशकर, उषा मंगेशकर, लालनताई सारंग, स्मिता तळवलकर, रिमा लागू अशा अनेक बहिणी मला इथे मिळाल्या. साडी खरेदी ही त्यांच्यासाठी एक निमित्त असते. त्या खरेदीच्या निमित्ताने इथले घरगुती व मंगलमय वातावरण अनुभवणे त्यांना जास्त आवडते. आत्या, मावशी, काकू अशा विविध रुपातून भेटणाऱ्या महिलांचा इथे सन्मान राखला जातो. म्हणूनच अशा नात्यांचा जणू स्नेह मेळावाच इथे भरतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्वामिनीचे संचालक नावेद व जावेद शेख यांनी आणखी मुद्दा मांडला तो म्हणजे, स्वामिनीने केवळ व्यवसाय एके व्यवसाय न करता त्याच माध्यमातून आपल्या भारतीय वस्त्रपरंपरेचेही जतन करण्याचे आणि संस्कृतीचे संवर्धन करण्याचे कार्य केले आहे.

स्वामिनीमध्ये खरेदीला जरी तरुणाई येत असली तरी खरेदी मात्र आवर्जून पैठणीची करतात. नेमकी हीच भावना ओळखून स्वामिनीने असेच दूर्मिळ होत जाणारे तब्बल 33 प्रकारचे पॅटर्न स्वतच्या कारखान्यात प्रांतोप्रांतीच्या खास कारागिरांकडून बनवून घेतले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)