महापालिकेत चर्चेसाठी 3 विरोधक, 23 सत्ताधारी ; पर्यावरणाची ऐशी तैशी

पुणे : प्रत्येक कार्यक्रमात शहाराच्या पर्यावरणावरून गळा काढणाऱ्या महापालिकेच्या नगरसेवकांना शहराच्या पर्यावरणाचे काहीच देणं घेणं नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. शहराच्या पर्यावरण सद्यःस्थितीचा अहवालावर चर्चा करण्यासाठी 162 मधील अवघे 26 नगरसेवक उपस्थित होते. त्यात , शिवसेनेच्या 1 तर राष्ट्रवादीचे 2 नगरसेवक उपस्थित होते तर सत्ताधारी भाजपचे 23 नगरसेवक उपस्थित होते. त्यामुळे एका बाजुला शहराच्या पर्यावरणने धोकादायक पातळी गाठली असताना, दुसऱ्या बाजूला बकेट, बाकडे आणि कापडी पिशव्यांच्या खरेदीची काळजी असलेल्या नगरसेवकांची उदासीनता पुन्हा एकदा समोर आली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
2 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)