…तर तुम्ही मोदींना मत द्या : अरविंद केजरीवाल 

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी आज आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोपरखळ्या मारल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ‘चौकीदार ही चोर हे’ या टीकेला प्रत्युत्तर देताना आपल्या ट्विटर खात्यावर नावापूर्वी चौकीदार हे नाव जोडले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कृतीची अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरद्वारे थट्टा उडवली असून ते लिहितात, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संपूर्ण देशाला चौकीदार बनवायचे आहे. जर तुम्हालाही आपल्या मुलांना चौकीदार बनवायचे असेल तर तुम्ही खुशाल नरेंद्र मोदींना मतदान करा परंतु जर तुम्हाला तुमच्या मुलांना इंजिनीयर डॉक्टर असं सुशिक्षित बनवायचा असेल तर सुशिक्षितांची पार्टी असलेल्या आम आदमी पक्षाला मतदान करा.”

हे देखील वाचा : काँग्रेस-आप आघाडी स्थापनेची धुरा पवारांच्या खांद्यावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)