अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला ; …मग तुमचे सरकार हवेच कशाला ?

तरुणाईच भाजपला म्हणेल मग तुमचे सरकार हवेच कशाला ?

मुंबई: सरकारी नोकरीचे खूळ डोक्यातून काढून टाकले पाहिजे. सरकारी नोकरी लागतेच कशाला? असे वक्तव्य राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात केले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. नोकऱ्या देऊ शकत नाही, तर तुमचं सरकार हवं तरी कशाला, असा सवाल देशातील तरुणच तुम्हाला करतील, असा इशारा अजितदादांनी ट्विटद्वारे दिला आहे.

-Ads-

सांगली, मिरज आणि कूपवाड महानगरपालिकेच्या वतीने दीनदयाळ अंत्योदय योजनेंतर्गत मोफत नोकरी, कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्याचा समारोप रविवारी चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाला. त्यावेळी पाटील यांनी हे वक्तव्य केले होते.

अजित पवार ट्विटमध्ये पुढे म्हणतात की, सत्तेत येण्यापूर्वी भाजपाने तरुणांना रोजगार देण्याचे स्वप्न दाखवले होते. सरकार आजही आपल्या प्रचारादरम्यान नोकरभरतीचे गाजर तरुणांना दाखवतेच आहे. मग चंद्रकांत पाटील असे बेजबाबदार वक्तव्य करूच कसे शकतात? असा प्रश्न देखील अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

तरुणाईच भाजपला म्हणेल मग तुमचे सरकार हवेच कशाला ?

तरुणाईच भाजपला म्हणेल मग तुमचे सरकार हवेच कशाला ? Ajit Pawar यांचा महसूलमंत्री Chandrakant Patil यांना टोला.. सरकारी नोकरीचे खूळ डोक्यातून काढून टाकले पाहिजे. सरकारी नोकरी लागतेच कशाला? असे बेजबाबदार वक्तव्य राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. नोकऱ्या देऊ शकत नाही, तर तुमचं सरकार हवं तरी कशाला, असा सवाल देशातील तरुणच तुम्हाला करतील, असा इशारा अजितदादांनी ट्विटद्वारे दिला आहे. सांगली, मिरज आणि कूपवाड महानगरपालिकेच्या वतीने दीनदयाळ अंत्योदय योजनेंतर्गत मोफत नोकरी, कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्याचा समारोप रविवारी चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाला. त्यावेळी पाटील यांनी हे वक्तव्य केले होते. अजित पवार ट्विटमध्ये पुढे म्हणतात की, सत्तेत येण्यापूर्वी भाजपाने तरुणांना रोजगार देण्याचे स्वप्न दाखवले होते. सरकार आजही आपल्या प्रचारादरम्यान नोकरभरतीचे गाजर तरुणांना दाखवतेच आहे. मग चंद्रकांत पाटील असे बेजबाबदार वक्तव्य करूच कसे शकतात?#Employment Bharatiya Janata Party (BJP) #फेकूसरकार

Posted by Nationalist Congress Party – NCP on Monday, 18 February 2019

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)