…तर युती तुटेल : रामदास कदम

मुंबई : २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेनेच्या युतीने महाराष्ट्रामध्ये मोठे यश मिळवले होते. लोकसभा जागांच्या बाबतीत देशातील दुसऱ्या सर्वात मोठे राज्य असलेल्या महाराष्ट्राच्या जनतेने ‘युती’च्या बाजूने कौल देत भाजपचे २३ तर शिवसेनेचे १८ खासदार लोकसभेवर निवडून दिले. मात्र लोकसभा निवडणुकांनंतर शिवसेना-भाजपच्या युतीमध्ये कटुता निर्माण झाली, याचाच परिणाम म्हणून या दोन्ही पक्षांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका देखील स्वबळावर लढवल्या. तब्ब्ल साडेचार वर्ष सत्तेत असून देखील दोन्ही पक्ष एकमेकांवर टोकाची टीका करताना दिसले. मात्र आता आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर दोन्ही पक्षांनी स्वबळाच्या तलवारी म्यानात ठेऊन पुन्हा एकदा हात मिळवले आहेत.

शिवसेना आणि भाजपाची युती झाली असली तरी दोन्ही बाजूच्या नेत्यांमध्ये अद्याप महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संभ्रमाचे वातावरण असल्याचे चित्र आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना थेट युती तोडण्याची भाषा केली आहे. रामदास कदम यांनी चंद्रकांत पाटील यांच्या एका भाषणातील ‘ज्याचे जास्त आमदार त्याच्याकडे मुख्यमंत्रीपद’ या वक्तव्याचा दाखला देत, जर ही भाजपची अधिकृत भूमिका असेल तर आपण उद्धव ठाकरेंना सांगून भाजपसोबतची युती तोडू असे वक्तव्य केले आहे.

-Ads-

यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांनी युतीची बोलणी करतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी अडीच वर्षांसाठी मिळावे ही अट भाजप पक्षश्रेष्ठींकडून मान्य करून घेतली आहे अशी महती देखील दिली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)