……तरच राफेलच्या किंमतींवर चर्चा होऊ शकेल 

राफेल कराराच्या संबंधातील सारा तपशील लोकांपुढे जाहीर करण्याची अनुमती मिळाली तरच राफेलच्या किंमतींबाबत कोर्टात चर्चा करण्यास अनुमती दिली जाईल असा अभिप्राय आज सुप्रिम कोर्टाने व्यक्त केला. राफेलच्या संबंधातील सारा तपशील लोकांपुढे जाहीर करायचा की नाही याचा निर्णय आम्हाला घ्यावा लागेल तो आम्ही घेऊ असेही कोर्टाने म्हटले आहे. कोर्टाने ऍटर्नी जनरलना सांगितले की राफेलच्या किंमतींबाबत लोकांना माहिती होणे गरजेचे आहे असे आम्हाला वाटले तर त्याचा आम्ही विचार करू.

36 राफेल विमाने खरेदी करण्याचा जो निर्णय सरकारने घेतला आहे त्या विषयी आम्हाला हवाईदलाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेणे आवश्‍यक वाटते आहे, त्यासाठी आम्ही संबंधीत अधिकाऱ्यांची मदत घेऊ. या विषयी संरक्षण दलातील अधिकाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या माहितीला फार महत्व नाही असेही कोर्टाने यावेळी स्पष्ट केले. विमानांच्या किंमती बाबत मला माहिती सांगता येणार नाही असे ऍटर्नी जनरल यांनी सुनावणीच्या एका टप्प्यात स्पष्ट केले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
4 :blush: Great
0 :cry: Sad
6 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)