…तर आसामच्या कारभार बांगलादेशी मुस्लिमांकडे जाईल-हिमंता 

गुवाहाटी – राज्यसभेत नागरिकत्व दुरूस्ती विधेयक मंजूर न होण्याची बाब आसामच्या दृष्टीने पराभव आहे. विधेयकाच्या अभावी आसाममधील विधानसभेच्या 17 जागा बांगलादेशी मुस्लिमांना जातील. एवढेच नव्हे तर, 2021 मध्ये संपूर्ण आसामचा कारभार त्यांच्याकडे जाईल, असे आसामचे मंत्री आणि भाजपचे नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी म्हटले आहे.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवारी समाप्त झाले.

मात्र, राज्यसभेत वादग्रस्त नागरिकत्व दुरूस्ती विधेयक सादर करण्यात आले नाही. मोदी सरकारच्या कार्यकाळातील अखेरचे अधिवेशन संपल्याने संबंधित विधेयक बाद ठरणार आहे. त्यापार्श्‍वभूमीवर, हिमंता यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. भाजपच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ एनडीएकडे राज्यसभेत बहुमत नसल्याने सरकारला विधेयक सादर करता येऊ शकले नाही. मात्र, एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर पुन्हा ते विधेयक मांडले जाईल. भाजप त्यासाठी वचनबद्ध आहे. त्याआधारे पक्ष आसाममध्ये आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरा जाईल. आसामी समाजाला ते विधेयकच वाचवू शकते. विधेयकाअभावी आसामची संस्कृती, भाषा नष्ट होईल, असा इशारा त्यांनी दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)