त्यांच्या गोलंदाजांनी खूपच भेदक गोलंदाजी केली – विराट कोहली

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा एक डाव आणि १५९ धावांची पराभव केला. या मानहानीकारक पराभवाबद्दल बोलताना भारताचा कर्णधार विराट कोहलीने पराभवाचे खापर खराब फलंदाजीवर फोडले. त्याचबरोबर इंग्लंडच्या संघाचे देखील कौतुक केले.

पोस्ट मॅच प्रेसेंटेशनच्या वेळी विराट म्हणाला, आम्ही ज्या पद्धतीने खेळलो त्यावर आम्ही थोडेही समाधानी नाही आहोत. मागील पाच सामन्यात आम्हाला असे कोणीच खेळाबाहेर ठेवू शकले नव्हते, ज्या पद्धतीने इंग्लंडच्या संघाने खेळ केला तो खूपच कौतुकास्पद होता. ज्यावेळी असा खेळ एखादा संघ करत असेल तर तो नक्कीच जिकंतो. तुम्ही येथील परिस्थिती विरोधात होती म्हणून रडत बसू शकत नाही. त्यांच्या गोलंदाजांनी खूपच भेदक गोलंदाजी केली.”

-Ads-

पहिल्या डावात भारतीय संघ अवघ्या १०७ धावत सर्वबाद झाला होता तर दुसऱ्या डावात भारताच्या फलंदाजांनी १३० धावांपर्यंत मजल मारली. दोन्ही डावात एकही भारतीय फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही.
गोलंदाजीमध्ये देखील फरतीयांना भरीव कामगिरी करता आली नाही.  इंग्लंडच्या फलंदाजांना  कमी धावसंख्येत रोखण्यात भारतीय गोलंदाज अपयशी ठरले. भारतीय संघ व्यवस्थापनाचा दोन फिरकी गोलंदाजांसोबत मैदानात उतरण्याचा निर्णय  चुकीचा ठरला. दोन्ही फिरकी गोलंदाजांच्या जाळ्यात एकही इंग्लिश फलंदाज सापडला नाही. फिरकी गोलंदाज एकही फलंदाज बाद करू शकले नाहीत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)