तिरुपती देवस्थानातील तीन हिरेजडित सुवर्णमुकुटांची चोरी

तिरुपती (आंध्र प्रदेश) : प्रसिद्ध तिरुपती देवस्थानातील तीन हिरेजडित सुवर्ण मुकुट चोरीस गेले आहेत. सुमारे 1.3 किलोग्रॅम वजनाचे हे तीन हिरेजडित सुवर्ण मुकुट शनिवारी चोरीला गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

तिरुपती देवस्थानातील गोविंदराज स्वामी मंदिराच्या पुजाऱ्यांना शनिवारी संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास देवतांचे हिरेजडित सोन्याचे तीन मुकुट गायब झाल्याचे समजले. टीटीडी (तिरुमाला तिरुपती देवस्थान) चे संयुक्त कार्यकारी अधिकारी पी प्रकाश यांनी सांगितले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संध्याकाळी बरोबर पाच वाजता धार्मिक उपचारांसाठी देवस्थानचे दरवाजे बंद केले जातात आणि साधारणपणे पावणेसहा वाजता पुन्हा उघडण्यात येतात अशी माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली. शनिवारी पावणेसहा वाजता दरवाजे पुन्हा उघडल्यानंतर हे तीन मुकुट गायब झाल्याचे आढळून आहे.

टीटीडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए के सिंघल, आणि अध्यक्ष पी सुधाकर यादव यांनीही या प्रकरणाची स्वत: चौकशी केली. आणि या बाबतीत रीतसर तक्रार नोंदवली. संध्याकाळी सीव्हीएसओ गोपिनाथ जेट्टी आणि तिरुपती (शहरी) पोलीस अधीक्षक अंबुरासन यांनी देवस्थानाला भेट दिली. तेथील सीसीटीव्हीचे फूटेज तपासण्यात येत आहे.
श्री गोविंदस्वामी मंदिर हे देवस्थान हे 12 शतकात निर्माण करण्यात आलेले प्राचीन मंदिर आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)