लंडनच्या स्वामीनारायण मंदिरातील कृष्णाच्या मूर्तींची चोरी 

लंडन (ब्रिटन) – लंडनच्या स्वामीनारायण मंदिरातील कृष्णाच्या तीन मौल्यवान मूर्तींची चोरी झाल्याचे मंदिराचे अध्यक्ष कुर्जीभाई कराई यांनी सांगितले आहे. 1975 साली लंडनच्या विलिस्डेन लेनमधील मंदिराची उभारणी झाली. तेव्हापासूनच या तीनही मूर्तींची मंदिरात स्थापना करण्यात आली होती. शुक्रवारी स्वामीनारायण मंदिरात दिवाळीचा कार्यक्रम झाल्यानंतर काही तासातच चोरी झाली. दिवाळी कार्यक्रमासाठी शेकडो भक्तजन जमा झाले होते.

चोरट्यांनी रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तूंबरोबर कृष्णाच्या तीन मूर्तीही चोरून नेल्या. या मूर्ती पितळेच्या आहेत, पण त्या सोन्याच्या असाव्यात अशा कल्पनेने चोरांनी त्या नेल्या असाव्यात असे कुर्जीभाईंनी सांगितले. मूर्ती गेल्यामुळे जगभरातील लाखो कृणभक्तांच्या भावनांना धक्का बसल्याचे सांगून मूर्ती सहीसलामत परत मिळतील अशी आशा त्यांनी व्यक्‍त केली आहे.

-Ads-

शुक्रवारी पहाटे 1.50 च्या सुमारास स्कॉटलंड यार्डला मंदिरात चोरी झाल्याचे कळवण्यात आले. पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज तपासत आहेत. अमेरिकेतील युनिव्हर्सल सोसायटी ऑफ हिंदुइझमचे अध्यक्ष राजन झेद यांनी लंडनचे महापौर सादिक खान आणि स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हे प्रकरण त्वरित आणि गंभीरतेने हाताळण्याची विनंती केली आहे.

स्वामीनारयण मंदिरातील भगवान कृष्णाच्या मूर्तींची चोरी म्हणजे मेहनती, समंजस आणि शांतिवादी हिदू समाजाला मोठाच धक्का असल्याचे त्यांनी म्हटले आहे. स्वामीनारायण मंदिरातील नेहमीच्या प्रार्थनांच्या वेळांमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)