नगर: येथील माळीवाड्यातील चंदुकाका ज्वेलर्स या सुवर्णपेढीत खरेदीच्या बहाण्याने आलेल्या एका अज्ञात महिलेने जाताना सोन्याचे डोरले चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि.7) दुपारी 12 च्या सुमारास घडली. या घटनेने सराफ व्यावासायिकात खळबळ उडाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, चंदुकाका ज्वेलर्स या दुकानात नेहमीप्रमाणे असलेल्या गर्दीचा फायदा घेवून ग्राहक बनुन आलेल्या एका अनोळखी महिलेने दागिने खरेदी करण्याच्या बहान्याने दुकानातील डोरले काऊंटरवर जाऊन दागिने पाहताना चार ग्रॅम वजनाचे (10 हजार रूपये) किमतीचे सोन्याचे डोरले चोरून नेले. ही घटना दुकानातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
या प्रकरणी कोतवाली पोलीसांनी नितीन वसंत गायकवाड (रा. पाटील गल्ली, भिंगार) यांच्या फिर्यादीवरून चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हे.कॉ. अनिल गिरीगोसावी हे करीत आहेत.