सुरक्षा रक्षकानेच केली चोरी

बंडगार्डन आयनॉक्‍स थिएटर येथील घटना

पुणे – आयनॉक्‍स थिएटरच्या कॅश काऊंटरमधून दीड लाख रुपयांची रोकड तेथील सुरक्षा रक्षकाने चोरुन नेली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यानंतर व्यवस्थापनाने बंडगार्डन पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच अवघ्या चार तासात संबंधित सुरक्षारक्षकास बेड्या ठोकण्यात आल्या. त्याच्याकडून चोरलेली रोकड हस्तगत करण्यात आली.

आतिश उद्धव कांबळे (24, रा. मुंढवा) असे अटक आरोपीचे नाव आहे. आयनॉक्‍स थिएटरच्या दुसऱ्या मजल्यावर कॅश काऊंटर आहे. येथे रूममधील तिजोरीत ठेवलेली 1 लाख 56 हजार रुपयांची रोख रक्कम कॅशिअरची नजर चुकवून तेथे सिक्‍युरिटीचे काम करणाऱ्या आतिशनचे पळवले होती. ही रोकड तो शर्टच्या आत टाकून पळून गेला होता. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर व्यवस्थापक अंकुर कटपाल यांनी बंडगार्डन पोलिसांत गुन्हा दाखल केला. दरम्यान, आरोपी त्याच्या घरी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तो बी.जी.शिर्के कंपनीजवळ असतानाच पोलिसांनी त्याला पैशांसह ताब्यात घेतले.

ही कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक संदीप जमदाडे, फिरोज शेख, नवनाथ रावडांगे, संतोष पगार, हरीष मोरे, अय्याज दड्डीकर, कैलास डुकरे, श्रीधर सानप, निखील जाधव यांच्या पथकाने केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)