भोपाळ – मध्य प्रदेशच्या मुरैना जिल्ह्यातील चंबल नदीमध्ये मगरीने एका 18 वर्षीय युवकाला जिवंत गिळल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली आहे. नरेंद्र तोमर असे मृत युवकाचे नाव आहे.
नरेंद्र नागरा घाट भागातून वाहणाऱ्या चंबल नदीत पोहोण्यासाठी उतरला होता. त्यावेळी मगरीने त्याच्यावर हल्ला केला. सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. गावकऱ्यांनी नरेंद्रला मगरीच्या जबड्यातून सोडवण्याचे भरपूर प्रयत्न केले. पण ते अपयशी ठरले. आजोबांच्या अत्यंविधीवरुन परतलेला नरेंद्र पोहोण्यासाठी नदीत उतरला होता.