मेट्रोच्या “त्या’ खांबाचे काम पुन्हा सुरू

पुणे – नदीपात्रात सुरू असलेल्या मेट्रोच्या खांबाचे कॉंक्रिटीकरणाचे काम चुकल्याने 25 मे रोजी एक उभा असलेला सुमारे 45 फुटांचा खांब महामेट्रोकडून तोडण्यात आला होता. हा खांब पुन्हा वेगाने सुरू करण्यात येत आहे. या खांबाचे काम अर्धवट झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर महमेट्रोने या खांबाची तपासणी केली होती. त्यात फुटिंगचे काम चांगले असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महामेट्रोकडून फुटिंग पर्यंतच खांब फोडण्यात आला होता. त्यानंतर आता फुटिंगपासून वर हे काम सुरू करण्यात आले आहे.

वनाज ते रामवाडी या मार्गावरील वनाज ते धान्य गोदाम हे मेट्रोचे काम सुरू आहे. त्या अंतर्गत नदीपात्रात सुमारे 1.7 किलोमीटरचा मार्ग असून त्यासाठी एकूण 59 खांब उभारले जाणार आहेत. त्यातील चार ते पाच खांबाचे काम हे दहा फुटांच्या वर गेले आहे. या खांबामधील 159 क्रमांकाच्या खांबाचे कॉंक्रिटीकरणाचे काम 30 फुटांच्या वर सुरू असताना जे कॉंक्रिट शटरिंगमध्ये भरण्यात येत होते ते बाहेर पडत होते. तसेच हे कॉंक्रिट खालील बाजूच्या आधीच्या बांधकामाशी जोडले गेले नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ही बाब त्यावेळी उपस्थित असलेल्या महामेट्रोच्या अभियंत्याच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी तातडीने हे कॉंक्रिटकरणाचे काम थांबविले, तसेच संपूर्ण खांबच जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर महामेट्रोकडून हा खांब सोडून इतर सर्व खांबाचे काम वेगाने सुरू होते. मात्र, गेल्या महिन्याभरापासून पुन्हा या खांबाचा राहिलेला भाग काढून टाकत फुटिंगपासून वर खांबाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे हा पुन्हा उभा राहत असून इतर खांबाच्या बरोबरच नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच त्याचेही उभारणी केली जाणार असल्याचे महामेट्रोच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)