सडकच्या सिक्वलमधील काम म्हणजे स्वप्न सत्यात उतरणे : आलिया 

“सडक’च्या सिक्वेलमध्ये काम करणे म्हणजे एखादे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे, असे आलिया भटने म्हटले आहे. “सडक’ रिलीज झाला तेंव्हा आलिया अगदी लहान होती. तिने तिच्या लहानपणी “सडक’ बघितला होता. त्या आठवणी तिच्या मनात कायम आहेत. आलियाचे आई सोनी राजदान पण होत्या. तिला खिडकीतून बाहेर फेकून देण्याचा सीन आलियाला कायम लक्षात राहिला. तिने या सीनबाबत पप्पा महेश भट यांना विचारलेही होते.

‘तुम्ही आईला अशाप्रकारे खिडकीतून बाहेर कसे काय फेकून दिले ?’ असे विचारले होते. मात्र तिच्या बालमनाला याचे उत्तर तेंव्हा पटले नव्हते. मोठे झाल्यावर “सडक’ हा केवळ एक सिनेमा आहे, हे तिला कळून चुकले. आता मोठेपणी “सडक 2’मध्ये काम करण्याने आपले लहानपणचे एक स्वप्न पूर्ण होईल, अशी भावना तिने व्यक्‍त केली आहे. या सिक्‍वेलच्या निमित्ताने महेश भट बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा दिग्दर्शनाकडे वळले आहेत. “सडक’च्या सिक्‍वेलमध्ये आलिया भट व्यतिरिक्‍त संजय दत्त, पूजा भट आणि आदित्य राय कपूर हे देखील मुख्य रोलमध्ये असणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)