महिला खासदार जेमतेम बारा टक्के

file photo

– शेखर कानेटकर

देशातील एकूण मतदारांपैकी महिला मतदारांची संख्या एकूण मतदारांच्या निम्मी म्हणजे 50 टक्के असली निवडणुकीतील महिला उमेदवारांची संख्या अवघी 7-7 टक्केच होती. महिलांना जास्तीत जास्त अगदी 50 टक्के आरक्षण देण्याची भाषा करणाऱ्या राजकीय पक्षांचे, त्यांच्या नेत्यांच्या ढोंगीपणाचे हे उदाहरण!

2014 साली झालेल्या 16 व्या लोकसभा निवडणुकीत एकूण 8 हजार 163 उमेदवार उभे होते. पण त्यातील महिला उमेदवार होत्या अवघ्या 631. भाजपने 543 पैकी 37 तर कॉंग्रेसने 57 महिलांनी संधी दिली.

631 पैकी अवघ्या 63 महिला गेल्या निवडणुकीत (2014) निवडून आल्या. हे प्रमाण एकूण लोकसभा सदस्यांच्या जेमतेम 12 टक्के आहे. अर्थात लोकसभेतील महिला खासदारांची आजवरची सर्वात मोठी संख्या होती, हे एक विशेष. 1952 च्या पहिल्या निवडणुकीत 20 महिला खासदार विजयी झाल्या होत्या. 62 वर्षांनंतर ही संख्या तिपटीनेच वाढली आहे.
महाराष्ट्रात 48 खासदारांपैकी मावळत्या लोकसभेत अवघ्या 6 महिला होत्या. उमेदवार म्हणून 101 जणी उभ्या होत्या. महिलांना 50 टक्के आरक्षण देण्याचे विधेयक दहा वर्षे संसदेत लटकले आहे. या सरकारनेही ते पुढे रेटले नाही.

आजवर निवडून आलेल्या महिला खासदारांची 1952 पासूनची आकडेवारी अशी – (आधी वर्ष-कंसात महिला खासदारांची संख्या) 1952 (20), 1957 (22), 1962 (31), 1967 (29), 1971 (21), 1977 (19), 1980 (28), 1984 (42), 1989 (29), 1991 (37), 1996 (37) 1998 (43), 1999 (49), 2004 (45), 2009 (58), 2014 (63).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)