राफेल प्रकरणावरून सत्ताधारी-विरोधक पुन्हा आमने सामने

नवी दिल्ली : तथाकथित राफेल घोटाळ्याबाबत काँग्रेसने आज लोकसभेमध्ये पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला. काँग्रेसने हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच राफेल प्रकरणाची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फत करण्यात यावी अशी जोरदार मागणी लावून धरली आहे.

लोकसभेमध्ये आज शून्य प्रहराच्या वेळी काँग्रेस नेत्यांनी ‘वेल’मध्ये जाऊन जोरदार घोषणाबाजी केली. राफेल प्रकरणाबाबत बोलताना काँग्रेसचे जेष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, “राफेल प्रकरणामध्ये निश्चितच घोटाळा असून यामुळेच सरकार लढाऊ विमानांचे भाव जनतेसमोर मांडण्यास तयार नाही. सरकारने या प्रकरणाची संयुक्त संसदीय समिती मार्फत चौकशी करावी.”

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खर्गे यांच्या आरोपांना उत्तर देताना, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, “एकच खोटी गोष्ट १० वेळा सांगितली म्हणून ती खरी होणार नाही. सरकार राफेलबाबत चर्चा करण्यास तयार असले तरी काँग्रेसच चर्चेपासून पळ काढत आहे.”

आज दुपारी २ वाजता सभागृहामध्ये पुरवणी मागण्यांसाठी चर्चा सुरु असताना, खर्गे यांनी पुन्हा एकदा राफेल प्रकरणाची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फत करण्यात यावी अशी मागणी केली.

यावर बोलताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले की, “खर्गे यांनी राफेलबाबत तात्काळ चर्चा सुरु करावी, सरकार चर्चेसाठी तयार आहे.”

“राफेलबाबत चर्चा झाल्यास आपण काँग्रेस कशाप्रकारे राफेलबाबत खोटी माहिती पसरवत आहे, हे आपण सिद्ध करून दाखवू.” असा दावा जेटली यांनी यावेळी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)