पतीला गरम कुकरने मारहाण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्नीला न्यायालयाची तंबी

पुणे: पतीला गरम कुकरने मारहाण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला न्यायालयाने दणका दिला आहे. न्यायालयाने तिला पतीविरोधात हिंसाचार करण्यास प्रतिबंध केले आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस.मतकर यांनी हा आदेश दिला आहे. अनेक प्रकरणांमध्ये पतीने मारहाण केल्यामुळे संरक्षण मिळविण्यासाठी महिला न्यायालयत धाव घेतात. मात्र, इथे पत्नीनेच मारहाणीचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.

पत्नीने पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गंत पोटगी करीता खटला दाखल केला होता. परंतु, पतीच पत्नीची देखभाल करीत असल्याने न्यायालयाने पोटगीची रक्कम ही दैनंदिन खर्चात विलीन केली होती. तसेच पत्नी ही घरगुती हिंसाचाराचा कोणाताही पुरावा दाखल न करू शकल्याने ऍड. विजयसिंह ठोंबरे, ऍड. हितेश सोनार, ऍड.नीलेश वाघमोडे यांच्यामार्फत पतीने न्यायालयात पत्नीचा दावा रद्दबातल करण्यासाठी अर्ज केला होता. त्याचा राग तिच्या मनात असल्याने ती स्वतः पतीस मानसिक आणि शारीरिक त्रास देत होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अशातच पत्नीने पतीशी वाद घालत त्याच्या डोक्‍यात गरम कुकर मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी पतीने स्वतःच्या बचावासाठी हात आडवा केला असता त्याच्या हाताला गंभीर दुखापत होऊन हात फ्रॅक्‍चर झाला. तसेच हातालाही भाजले. ऍड. ठोंबरे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानंतर न्यायालयाने पतीला मारहाण करणाऱ्या त्या पत्नीला तंबी दिली आहे. घरगुती हिंसाचाराचा हा प्रकार गंभीर असून महिलांद्वारे पतीचा छळ करण्यासाठी कायद्याचा दुरूउपयोग देखील केला जातो. त्याकरता कायद्यामध्ये सुधार होणे गरजेचे असल्याचे मत ऍड. ठोंबरे यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)