धरणसाठ्यात महिन्याभराचे पाणी वाढले

पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला

पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत महिन्याभराचा पाणीसाठा वाढला आहे. दरम्यान, शनिवारी आणि रविवारी या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला होता. मात्र, सोमवारी दिवसभरात पुन्हा पावसाच्या दमदार सरी बरसल्याने धरणात वाढ होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.

खडकवासला प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव तसेच टेमघर धरणांत मागील आठवड्यात गुरुवारपासून दमदार पावसाला सुरुवात झाली होती. या दिवशी या चारही धरणांचा पाणीसाठा सुमारे 2.20 टीएमसी होता. मात्र, या पावसाने हा साठा वाढण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर शनिवार व रविवारी पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र, सोमवारी पुन्हा दिवसभर या चारही धरणांत दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. सोमवारी दिवसभर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता या चार धरणांत सुमारे 3.29 टीएमसी पाणीसाठा झाला होता. तसेच पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसानेही धरणात नदी, नाले तसेच ओढ्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे.

पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, खडकवासला धरणात दिवसभरात 29 मिमी, पानशेत धरणात 52 मिमी तर वरसगावधरणाच्या पाणलोट क्षेत्रात 56 मिमी आणि टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 77 मिमी पाऊस झाला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here