वेगळा रंग दाखवणाऱ्यांना मतदार मतपेटीतूनच धडा शिकवेल- अजित पवार

मुंबई: या सरकारनं सगळ्यांचाच भ्रमनिरास केला. दिलेली आश्वासनं पाळली नाहीत. लोकांवर फक्त बंधनं घातली. खोटी भांडणं करुन जनतेला फसवलं. युतीत २५ वर्षे सडलो म्हणणारे अफजल खानाला जाऊन मिळाले, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेना-भाजपवर केली. तसेच निवडणुकीआधी वेगळा आणि नंतर वेगळा रंग दाखवणाऱ्यांना मतदार मतपेटीतूनच धडा शिकवेल. असेही ते म्हणाले

रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोदी सरकारवर टीकेची भडीमार सुरु केला आहे. आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरी जाऊन राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, गर्जे यांनी रंगपंचमी साजरी केली. दरम्यान,  ”सत्तर सालो में बदल गया मेरा देस, पंतप्रधान भी कहने लगा चौकीदार चौकीदार का देस,” अशी टीका आव्हाड यांनी केली.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)