बनावट औषधांनी जगभरात घेतले 3 लाख मुलांचे बळी – अहवाल

वॉशिंग्टन (अमेरिका) : बनावट औषधांनी जगभरात 3 लाखांहून अधिक मुलांचे बळी घेतले आहेत. मलेरिया, न्यूमोनिया आणि इतर रोगांवरील निर्धारित मानकांपेक्षा कमी दर्जाच्या बनावट औषधांमुळे हजारो मुलांचे बळी जात आहेत. अशा बनावट औषधांमुळे 3 लाखांपेक्षा अधिक मुलांचे बळी गेले आहेत. आणि ही गंभीर चिंतेची बाब असल्याचे जोल ब्रीमन यांनी म्हटले आहे. जोल ब्रीमन हे अमेरिकेतील राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या फोगार्ट आंतरराष्ट्रीय केंद्राचे सल्लागार आहेत.

कोणत्याही प्रकारची बनावट औषधे विकणारे हे मानवजातीचे खुनी असल्याचा आरोप करत सध्या बनावट औषधांचा व्यवसाय हा चरम सीमेवर पोहचल्याचे ब्रीमन यांनी सांगितले. औषधाचे नाव आणि त्यातील घटक चुकीचे असणे-निर्धारित मानकांप्रमाणे औषध नसणे आणि कोठेही प्रमाणित केलेले नसणे असे बनावट औषधांचे तीन प्रकार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

बनावट औषधांचा धंदा दिवसेदिवस फोफावत असल्याची माहिती जोल ब्रीमन आणि त्यांच्या टीमने दिली आहे. 2008 साली 75 देशांत 29 औषधे बनावट प्रकारे निर्माण केली जात होती, तर आता दहा वर्षांनंतर 113 देशात 95 प्रकारची बनावट औषधे बनविंण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)