पुलवामा हल्ल्यात वापरलेल्या वाहनाचा छडा लागला! ‘स्कॉर्पियो’ न्हवे ‘हे’ वाहन वापरण्यात आले होते…

संग्रहित छायाचित्र...

जम्मू-काश्मीर : पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला ११ दिवस उलटल्यानंतर आज हल्ल्यामध्ये वापरण्यात आलेली स्फोटके वाहून नेण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहनाचा छडा लावण्यात आला आहे. पुलवामा येथे केंद्रीय सुरक्षा दलांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांकडून एका चारचाकी वाहनामध्ये स्फोटके भरून ते वाहन केंद्रीय सुरक्षा दलाच्या ताफ्याशेजारी न्हेऊन ‘आयईडी’द्वारे स्फोट घडविण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये केंद्रीय सुरक्षा दलाच्या ४० जवानांना वीरगती प्राप्त झाली होती.

दरम्यान, हा हल्ला घडवून आणण्यासाठी वापरण्यात आलेले वाहन हे ‘स्कॉर्पियो’ असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता मात्र आता ‘एनआयए’ने फॉरेन्सिक विभाग आणि ऑटोमोबाईल एक्सपर्टच्या मदतीने या गाडीबाबत छडा लावला असून हल्ल्यात वापरण्यात आलेली चारचाकी गाडी ही ‘स्कॉर्पियो’ नसल्याचा उलगडा झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एनआयए’ने हल्ल्यामध्ये वापरण्यात आलेल्या गाडीच्या प्रकारासह गाडीमालकाचे नाव देखील शोधून काढले आहे. एनआयए’द्वारे हल्ल्यामध्ये वापरण्यात आलेले वाहन हे मारुती कंपनीची इको हे असल्याचे स्पष्ट केले असून मूळचा काश्मिरी असलेला सैजाद भट हा या वाहनाचा मालक असल्याचे उघड करण्यात आले आहे. सैजाद भट हा जैश-ए-मोहम्मद संघटनेमध्ये सहभागी झाला असल्याची माहिती देखील एनआयएने दिली आहे.

https://twitter.com/ANI/status/1100032247053205504

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)