सौर ऊर्जेचा वापर वाढणार 

नवी दिल्ली  – सॉफ्टबॅंकेने आंतरराष्ट्रीय सोलर अलायन्समध्ये सदस्य असणाऱ्या सर्व देशांना पुढील 25 वर्षांनंतर मोफत वीज देण्याचा वादा केला आहे. जपान गुपचे संस्थापक आणि सीईओ मासायोसी सन यांनी याविषयी माहिती दिली आहे. सध्या इतकी वीज निर्माण करण्यासाठी पैसे आणि तंत्रज्ञानाची अडचण असल्याने ही योजना चालू करण्यास उशिर लागणार असल्याचे म्हटले.

पुढील 25 वर्षात सुरु करण्यात येणाऱ्या योजनांवर आधारित ही गुंतवणूक करण्यात येणार. त्याच्या नंतर योग्य त्या ठिकाणी वीज निर्माण करणारे सौर ऊर्जेचे प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचा विश्वास सन यांनी व्यक्त केला आहे. सौर पॅनल एकदा बनवण्यात आल्यावर ते पुढे 80 वर्षांच्या कालावधी पर्यत वापर करता येणार असल्याचे यात म्हटले आहे. प्रथम हे पॅनेल 90 ते 100 टक्क्‌ी इतके कार्यक्षम राहू शकतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

थोडा वेळ गेल्यानंतर यांची क्षमता कमी होत जाते आणि ती 85 टक्क्‌यांपर्यत येऊ शकते. असेच प्रमाण पुढेही 55 वर्षापर्यत वीज निर्मीती करत राहतात. जपानमध्ये 2011 ला न्यूक्‍लिर प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेनंतर नैसर्गिक गोष्टीचा वापर करुन वीजनिर्मिती करण्याचा निर्णय सन यांनी घेतला, ते सॉफ्टबॅंके कार्यरत असल्यानेच सौर ऊर्जा प्रकल्पाला महत्त्व देण्यासाठी आणि त्यांत वाढ करण्यासाठीच सन यांनी प्रयत्न चालू ठेवलेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)