अफगाण शांतिवार्तेसाठी अमेरिकेने मागितली पाकची मदत : फवाद चौधरी

इस्लामाबाद (पाकिस्तान): अफगाण शांतिवार्तेसाठी अमेरिकेने पाकिस्तानची मदत मागितली आहे. पाकिस्तानचे माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी ही माहिती दिली आहे. गेली 17 वर्षे अफगाणिस्तानमध्ये तालिबान आणि सुरक्षा दले यांच्यात संघर्ष चालू आहे. हा संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना एक पत्र पाठवले असल्याचे फवाद चौधरी यांनी सांगितले.

अफगाणिस्तानमधील संघर्ष संपवून तेथे शांती प्रस्थापित करण्यासाठी मदत करावी म्हणून अमेरिकन अधिकारी दीर्घकाळापासून पाकिस्तानवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टिप्पणी फवाद चौधरी यांनी केली आहे. पाकिस्तानी सीमेलगत तालिबानने आपले ठाणे बनवले असल्याने पाकिस्तानने तालिबान नेतृत्वाला शांतिवार्तेच्या बैठकीस राजी करावे. अफगाणिस्तनमधील संघर्ष संपवण्याच्या दृष्टीने अमेरिका आणि पाकिस्तान यांचे संबंध महत्त्वपूर्ण आहेत, असे अमेरिकेचे म्हणणे आहे.

दहशतवादाच्या मुद्‌द्‌यावर अमेरिकेने पाकिस्तानबाबत कडक भूमिका घेतल्याच्या पार्श्‍वभूमीवर चौधरी यांचे हे निवेदन आले आहे. अब्जावधी डॉलर्सची मदत घेऊनही पाकिस्तानने अमेरिकेसाठी काहीही केलेले नाही. दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई केलेली नाही, असे ट्रम्प याऩी अलीकडेच म्हटले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)