लॉ परीक्षांचा ‘भार’ कॉलेजवर मुंबई विद्यापीठाचा प्रताप

उच्च न्यायालयाकडून कान उघडणी जमत नसेल तर विद्यापीठाला टाळे ठोका

विद्यापीठाच्या 53 कॉलेजमध्ये 47 पूर्णवेळ प्राध्यापक


मुंबई  –
मुंबई विद्यापीठ क्षेत्रातील 53 लॉ कॉलेजमध्ये केवळ 47 पूर्ण वेळ प्राध्यापांकाच्या गाड्या रेटताना लॉ अभ्यास क्रमाच्या परीक्षेचा भारही कॉलेजवर टाकणाऱ्या विद्यापीठाच्या कारभारावर उच्च न्यायालयाने आज तिव्र संताप व्यक्त केला. तुम्हाला कारभार चालविणे जमत नसेल तर विद्यापीठ बंद करा, अशा शब्दांत मुंबई विद्यापीठाचे कान उपटले.
मुंबई विद्यापीठाने चालू शैक्षणिक वर्षापासून 60-40 गुणांचा फॉर्मल्यानुसार परिक्षा घेण्याचा निर्णय घेऊन या परीक्षेचा भार हा कॉलेजकडे सोपविला.

विद्यापीठाच्या या निर्णयाविरोधात लॉ विद्यार्थी पार्थव सारथी याच्या वतीने ऍड. सचिन पवार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर न्यायमूर्ती भुषण गवई आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्याच्या वतीने ऍड. उदय वारूंजीकर यांनी बाजू मांडली. मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या 57 लॉ कॉलजेमध्ये केवळ 47 पुर्णवेळ प्राध्यापक आहेत. तर काही कॉलेजमध्ये प्राचार्यांच्या जागा रिक्त आहे. केवळ तासिकेनुसार अर्धवेळ प्राध्यापकांद्वारे अभ्यासक्रम पूर्ण केला जातो. असे असताना विद्यापीठाने आता परीक्षेचा नवीन फार्मूला तयार करून ही परीक्षा कॉलेजवर सोपविली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यामध्ये 60 गुणांची लेखी परीक्षा आणि 40 गुणे अंतर्गत मुल्यमानानुसार कॉलेजला देण्याची मूभा दिली आहे. त्यात विद्यार्थांचे नुकसान होणार आहे. तसेच पहिले सत्र संपत आल्यावर विद्यापिठाने हा निर्णय घेतला आहे. विद्यार्थांना कॉलेजमध्ये सर्व कागदपत्रे सादर करण्यासाठी दबाव टाकला जात आहे. जर वेळत ती पूर्ण केले नाही तर त्यांच्याअंतर्गत गुणांवर परिणाम होण्याची शक्‍यता असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. यावेळी विद्यापीठाकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी न्यायालयाने तिव्र शब्दात संताप व्यक्त केला. तुम्हाला जर जमत नसेल तर विद्यापीठच बंद करा, अशा शब्दांत कान उपटले. विद्यापीठाला भूमीका स्पष्ट करण्याचे आदेश देऊन याचिकेची सुनावणी 29 ऑक्‍टोबरपर्यंत तहकूब ठेवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)