अफगाणिस्तानातून मोठ्या प्रमाणात सैन्य कपात करण्याची अमेरिकेची घोषणा

वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानातून मोठ्या प्रमाणावर सैन्य कपात करण्याची घोषणा केली आहे. कालच अमेरिकेने सीरियातून संपुर्ण सैन्य मागे घेण्याची घोषणा केली होती. त्या पाठोपाठ अमेरिकेकडून ही महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. सैन्य कपातीचा निर्णय झाला आहे आणि ही कपात मोठ्या प्रमाणावर असेल अमेरिकेच्या अधिकृत सूत्रांनी एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितले.

सध्या अमेरिकेचे सुमारे 14 हजार सैनिक अफगाणिस्तानात कार्यरत आहेत. त्याखेरीज नाटोचेही लष्कर तेथे कार्यरत असून ते तेथील तालिबानच्या दहशतवाद्यांच्या विरोधात लढत आहेत. सीरिया आणि अफगाणिस्तान बाबत अध्यक्ष ट्रम्प यांनी अचानक घेतलेले हे दोन्ही निर्णय अनाकलनीय आहेत अशी भावना ट्रम्प प्रशासनातील अधिकाऱ्यांचीच झाली आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या माहितीनुसार अमेरिका अफगाणिस्तानातील निम्मे सैन्य मागे घेणार आहे. तालिबानच्या विरोधात लढण्यापेक्षा त्यांच्याशी शांतता चर्चा करण्यास ट्रम्प प्रशासनाला अधिक स्वारस्य आहे असे सांगण्यात येते.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)