पुलवामामध्ये जैश ए मोहंम्मदची दोन मोड्युल उद्‌ध्वस्त

file photo

10 जणांना अटक

श्रीनगर: जम्मू काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात जैश ए मोहंम्मद या दहशतवादी संघटनेची दोन मोड्युल उद्‌ध्वस्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी 10 जणांना अटक करण्यात आली आहे आणि मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सोमवारी सांगितले. त्राल भागात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा तपास करण्यासाठी पोलिसांचे एक विशेष पथक स्थापन करण्यात आले होते.

-Ads-

या हल्ल्यामध्ये नागरिक आणि सुरक्षा रक्षकांना लक्ष्य केले गेले होते. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या हल्ल्यांच्या तपासादरम्यान दक्षिण काश्‍मीरमध्ये पोलिसांनी “जैश’ ची दोन मोड्युल उद्‌ध्वस्त करण्यात आली आहेत. पामपोरा भागातील अवंतीपोरा आणि ख्रीऊ या भागांमधील 10 जणांना अटक करण्यात आले असल्याचेही पोलिस प्रवक्‍त्याने सांगितले.

पिंगलीश येथील रहिवासी असलेल्या युनिस नबी नाईक, फय्याझ अहमद वाणी (रेशिपोरा), अहमद गानइ (निगीनपोरा) आणि बिलाल अहमा राथर (हफू निगीनपोरा) या चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या चौघांचा त्राल भागातील हल्ल्यांशी संबंध असल्याचे चौकशीमध्ये लक्षात आले.

तर पामपोराभागात जैश ए मोहंम्मदच्या जावेद अहमद पर्रेय, यासिर बशीर वाणी, ताहिर युसुफ लोन, रफिक अहमद भट, जावेद अहमद खांडे आणि इम्रान नाझीर (सर्व ख्रीऊ येथील रहिवासी) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यामध्ये जीलेटीन कांड्या, डिटोनेटर्स, आयईडी आणि हातबॉम्ब करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)