तिहेरी तलाकबाबतचा अध्यादेश रद्द होणार

नवी दिल्ली: “तिहेरी तलाक’वर बंदी आणणाऱ्या विधेयकाला हिवाळी अधिवेशनामध्ये राज्यसभेची मंजूरी मिळू शकलेली नाही. त्यामुळे या संदर्भातील अध्यादेश या महिन्याच्या अखेरीस बाद होणार आहे. मात्र सरकारकडून तिहेरी तलाकवर बंदी आणणारा अध्यादेश पुन्हा एकदा लागू केला जाणार आहे मात्र हा अध्यादेश कधी काढला जाईल याबाबतचा कालावधी अद्याप निश्‍चित नाही, असे सरकारी सूत्रांच्या वतीने सांगण्यात आले.

कोणत्याही अध्यादेशाची मुदत 6 महिने असते. मात्र अधिवेशन सुरु होण्याच्या दिवसापासून त्यासंदर्भातील विधेयकाला 42 दिवसांच्या (6 आठवडे) आत संसदेची मंजूरी मिळणे आवश्‍यक असते. अन्यथा हा अध्यादेश बाद होतो. या कालावधीमध्ये संसदेची मंजूरी मिळू शकली नाही, तर पुन्हा अध्यादेश काढण्याची सरकारला परवानगी असते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संसदेचे हिवाळी अधिवेशन गेल्या वर्षी 11 डिसेंबरला सुरु झाले. तेंव्हापासून 42 दिवस 22 जानेवारीला होतात. या दिवशी या अध्यादेशाची मुदत संपलेली असेल. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 31 जानेवारी रोजी सुरुवात होईल. त्याच्या आठवडाभर आगोदरच हा अध्यादेश बाद झालेला असेल. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये संसदेकडून “तिहेरी तलाक’बंदीचे विधेयक मांडले जाईल. मात्र अध्यादेशाची मुदत संपल्यानंतर लगेचच नव्याने अध्यादेश काढला जाईल की नाही, हे समजू शकलेले नाही.

आणखी एक पर्याय म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत वाट पहाणे. तोपर्यंत जर या संदर्भातील विधेयक मंजूर झाले नाही, तर नव्याने अध्यादेश काढण्याचा पर्याय सरकारसमोर खुला असेलच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)