नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात काम करणाऱ्या एका माजी महिला कर्मचाऱ्याने लैंगिक शोषणाचे आरोप लावले होते. सरन्यायाधीशांवर लावण्यात आलेल्या या आरोपांची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती एसए बोबडे, न्यायमूर्ती इंदु मल्होत्रा आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची समिती स्थापन करण्यात आली होती.
दरम्यान, या प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय समितीने आज सरन्यायाधीशांवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावरील आरोप सिद्ध करणारा एकही पुरावा न्यायालयामध्ये सादर करण्यात आला नसल्याने सदर महिलेचे आरोप फेटाळून लावण्यात येत असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयातील त्रिसदस्यीय समितीने दिला.
The three member in-house committee of the Supreme Court has found no substance in the sexual harassment allegations against Chief Justice of India Ranjan Gogoi. pic.twitter.com/cG4yVB8ViR
— ANI (@ANI) May 6, 2019