लग्नाअगोदरच आई होण्याचा ट्रेन्ड

महिन्याभरापूर्वीच अॅमी जॅक्‍सनच्या “गुड न्यूज’ची बातमी पुढे आली होती. आपल्या अब्जाधीश बॉय फ्रेन्डबरोबर ती पुढच्या वर्षी विवाहबद्ध होणार आहे, असेही या गोड बातमीबरोबर समजले होते. अॅमी सध्या विदेशात आपल्या मित्राबरोबरच राहते आहे. तिच्या प्रेग्नन्सीचे अपडेटही ती सोशल मिडीयावरून शेअर करते आहे. आता लग्नाअगोदरच आई बनण्याच्या बाबतीत आणखीन एका सेलिब्रिटीचा नंबर लागला आहे.

अर्जुन रामपालची गर्लफ्रेंडही लग्नाअगोदरच आई बनण्याच्या तयारीत आहे. अर्जुन रामपालने गेल्या वर्षी पत्नी मेहर जेसियाला घटस्फोट दिला. त्यानंतर त्याचे दक्षिण आफ्रिकेतील मॉडेल- अॅक्‍ट्रेस गैब्रिएला डेमोट्रीएटसबरोबर अफेअर असल्याचे जाहीर करून टाकले.

आता आपली ही गर्लफ्रेंड प्रेग्नंट आहे, असे अर्जुनने सोशल मीडियावरून जाहीर करून टाकले. अर्जुनने सोशल मिडीयावर गैब्रिएलाचा एक रोमॅंटिक फोटो शेअर केला आणि त्याखाली एक अत्यंत भावनिक कॅप्शनही लिहिली आहे. “तू माझ्या जीवनात आहेस, मी तुझ्याबरोबर नव्याने जीवन जगायला सुरुवात करू शकतो आहे. तू माझ्या जीवनात आणखी एक छोटा पाहुणा आणते आहेस, त्याबद्दल मी तुझा खूप खूप आभारी आहे. मी स्वतःल खूपच भाग्यवान समजतो आहे.’ असे अर्जुनने या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

अर्जुन रामपालला पूर्वाश्रमीची पत्नी मेहर जेसियापासून महिका आणि मायरा या दोन मुली आहेत. यातली मोठी मुलगी काही दिवसातच बॉलीवूडमध्ये पदार्पणही करणार आहे, असे स्वतः अर्जुननेच मध्यंतरी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते. मेहरपासून विभक्‍त झाल्यावर अर्जुन सातत्याने आपल्या अफेअरमुळे चर्चेत राहिला होता. प्रोफेशनल फ्रंटवर बोलायचे तर काही दिवसांपूर्वी “डॅडी’मध्ये त्याने गॅंगस्टर अरुण गवळीचा रोल केला होता. अगदी अलिकडे त्याने “द फायनल कॉल’नावाच्या एका वेबसिरीजमध्येही काम केले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)