वाराणसी – पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींचा दुसरा कार्यकाळ सुरू होण्याबरोबरच त्यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीची स्वप्ने साकार करण्याच्या दिशेने पावले पडली आहेत.
रिंग रोड, बहुमजली वाहनतळ, मेट्रो, मोनो रेल्वे आणि विकासाशी संबंधित अन्य प्रकल्प साकारण्याचे प्रयत्न गतिमान झाले आहेत. शहराच्या समस्यांमागे लोकसंख्या कारणीभूत असल्याचे मानत नवी काशी वसविण्यास मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात सर्वोच्च प्राधान्य मिळाले आहे.
काशीला विकासाच्या दृष्टिकोनातून जगातील अद्भुत नगरीचे स्वरूप देण्याचे संकेत मोदी यांनी दिले होते. रिंग रोडनजीक नवे शहर विकसित करण्यासाठी जमीन निर्धारित करण्याची कवायत सुरू झाली आहे.