हत्तीच्या धडकेने रेल्वे घसरली 

गुवाहाटी – हत्तीने धडक दिल्याने रेल्वे रूळावरून घसरल्याचा प्रकार आज येथे घडला. तितबार आणि मरियानी या स्थानकांच्या दरम्यान गुवाहाटी – लेडो एक्‍स्प्रेसला हत्तीने धडक दिल्याने एक्‍स्प्रेसचे काही डबे रूळावरून घसरले पण या प्रकारात सुदैवाने कोणी जखमी झाले नाहीं. पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमाराला हा प्रकार घडला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पावणे आठ वाजेपर्यंत विस्कळीत झाली होती.

काही हत्तींचे कळप या भागातून नेहमीच रेल्वे रूळ क्रॉस करून जात असतात. अशा वेळी रेल्वेचा वेग कमी केला जातो तसा तो याहीवेळी केला गेला होता असे संबंधीत अधिकाऱ्यांनी सांगितले. या दक्षतेमुळे हत्तीची रेल्वेला धडक बसण्याचे सुमारे 200 प्रकार रेल्वेने वन अधिकाऱ्यांच्या मदतीने टाळले आहेत असेही या अधिकाऱ्याने सांगितले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)