“शबरीमला’ची परंपरा खंडित

दोन महिलांनी मंदिरात प्रवेश करत घेतले अयप्पाचे दर्शन

मंदिर समितीकडून मंदिरात शुद्धिकरण

शबरीमला\तिरुवनंतपुरम: केरळमधील शबरीमला मंदिराची शेकडो वर्षांची परंपरा आजअखेर खंडित झाली आहे. मंदिरात प्रवेश करण्याला होत असलेला विरोध डावलीत दोन महिलांनी शबरीमला मंदिरात भगवान अयप्पाचे दर्शन घेतले.
बिंदू आणि कनकदुर्गा अशी या दोन महिलांची नावे आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही महिलांनी व्हर्नाकुलर वृत्त वाहिनीशी बोलताना आज पहाटे साडेतीन वाजता दर्शन घेतल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी पोलीस संरक्षण घेत मंदिरात प्रवेश केला. सुरक्षेच्या कारणास्तव ही माहिती उघड करण्यात आली नव्हती, असेही त्यांनी म्हटले.

“आम्ही पहाटे साडेतीन वाजता भगवान अयप्पाचे दर्शन घेतले. यावेळी पोलीस आमच्या सोबत होते,’ अशी माहिती या महिलांनी दिली. दर्शन घेतल्यानंतर या दोन्ही महिला कुठे आहेत, याबाबत गुप्तता राखण्यात आली आहे. शबरीमला मंदिरात 10 ते 50 वर्षांच्या दरम्यान वय असणाऱ्या महिलांना प्रवेश करण्यापासून रोखता येणार नाही, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षी दिला होता. मात्र या आदेशानंतरही आतापर्यंत कोणत्याही “प्रतिबंधित’ वयाच्या महिलांनी अयप्पाचे दर्शन घेतलेले नाही. अनेक महिला कार्यकर्त्यांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्नही केला होता. परंतु मोठ्या विरोधामुळे त्यांना प्रवेश करता आला नाही. त्यानंतर मुख्यमंत्री पी. विजयन यांनी महिलांना दर्शन घ्यावयाचे असल्यास त्यांना पोलीस संरक्षण देण्यात येईल असे म्हटले होते.

दुसरीकडे शुद्धिकरण विधीसाठी मंदिर समितीकडून दर्शन बंद करण्यात आले. या दोन महिलांनी प्रवेश केल्यामुळे मंदिर समितीकडून मंदिरात शुद्धिकरण करण्यात आले. दरम्यान, नववर्षाचा पहिल्याच दिवस शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाच्या मागणीसाठी मंगळवारी केरळमध्ये मानवी साखळी बनवणाऱ्या महिलांवर भाजप-आरएसएसच्या काही कथित कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती. या लोकांनी प्रसारण प्रतिनिधी आणि पोलिसांवरही दगडफेक केली. जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)