अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्ध पुन्हा भडकण्याची चिन्हे

जिनिव्हा: अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्ध पुन्हा एकदा भडकण्याची चिन्हे दिसायला लागली आहेत. जागतिक व्यापार संघटनेमधील अमेरिकेच्या राजदूतांनी चीनवर तंत्रज्ञान चोरीचा आरोप केला आहे. अमेरिकेच्या राजदूतांकडून अंगुलीनिर्देश केला गेल्याचा आरोप चीनकडून केला गेला. यामुळे दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये काही काळ तणाव निर्माण झला होता.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यासाठीची तयारी जागतिक व्यापार संघटनेमधील काही सदस्य देशांनी केली होती. “डब्लूटीओ’मधील नियमित प्रक्रियेनुसार अमेरिकेबाबतच्या धोरणाचा फेरविचार व्हावा, हा त्यामागील उद्देश होता. बुधवारी झालेल्या दुसऱ्या फेरीच्या चर्चेदरम्यान अमेरिकेचे राजदूत डेनिस शिया यांनी चीनसंदर्भात बोलताना विदेशी उत्पादकांना रोखण्यासाठी विदेशात स्वस्तात विक्री करण्याचा आणि तंत्रज्ञान चोरीचा शेरा मारला होता.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)