ब्रिस्टल – गत काही काळापासुन खराब फॉर्मचा शिकार झालेल्या श्रीलंकेच्या संघासमोर आज विश्वचषक स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघाच्या हृदयाचा ठोका चुकवणारी कामगिरी करणाऱ्या बांगलादेशचे आव्हान असणार आहे.
लडंन मधील ब्रिस्टल शहरातील काउंटी मैदानावर आज श्रीलंका विरूध्द बांगलादेश हा सामना होणार आहे. मात्र पावसाचा अडथळा असल्याने नाणेफेकीला आणि सामना सुरू होण्यास विलंब होणार आहे.
We've got good news and bad news 🙂 😞
The toss at Bristol has been delayed due to rain, but the covers are being peeled off, and an inspection is due at 10:30am.
Here's hoping the weather stays true! 🤞 #CWC19
Stay tuned for #BANvSL updates 👇 https://t.co/72NKcaGxQL pic.twitter.com/jMR0L4vgGv
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) June 11, 2019
दरम्यान, बांगलादेशच्या संघाने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेची सुरूवात दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर आपली एकदिवसीय क्रिकेट मधील सर्वात मोठी धावसंख्या उभारत केली होती. त्या सामन्यात बांगलादेशने 330 धावा करत दक्षिण आफ्रिकेचा 21 धावांनी पराभव केला. तर, दुसऱ्या सामन्यात न्युझीलंडच्या संघाकडून अतितटीच्या सामन्यात पराभुत झाल्यानंतर इंग्लंड विरुद्ध मोठा पराभव पत्करावा लागला होता. मात्र, या तिन्ही सामन्यात बांगलादेशच्या संघातील फलंदाजांनी चमकदार कामगिरी करत आपल्या प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांची मनसोक्त धुलाई केली होती. यात अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन आणि यष्टीरक्षक फलंदाज मुश्फिकुर रहिम यांची फलंदाजी वाखाणन्याजोग होती.
दुसरीकडे, अंतर्गत कलहामुळे आणि खेळाडूंना सातत्यपुर्ण कामगिरी करण्यात आलेल्या अपयशामुळे गतकाही काळापासुन खराब फॉर्ममध्ये असणाऱ्या श्रीलंकेसमोर फलंदाजांचा खराब फॉर्म हीच एकमेव मोठी समस्या असुन केवळ दिमुथ करुणारत्ने आणि कुशल परेरा हे फलंदाज आपल्या फलंदाजीने संघाचा डाव सावरताना दिसुन येत आहेत. त्यातच अष्टपैलू खेळाडू आणि मधल्या फळीतील महत्वाचा समजला जाणारा अँजेलो मॅथ्युजहा सरस कामगिरी करण्यात सातत्याने अपयशी होत असुन श्रीलंकेच्या संघाला विश्वचषक स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखायचे असेल तर मॅथ्युजला आपल्या कामगिरीत सुधारणा करणे गरजेचे आहे.