राष्ट्रीय संशोधन संस्थेतील वरीष्ठ तांत्रिक अधिकाऱ्याचे माओवाद्याशी संबंध

रायपुर: हैदराबाद येथील प्रख्यात नॅशनल जिओफिजीकल रिसर्च इन्स्टिट्युट या संस्थेतील एक वरीष्ठ तांत्रिक अधिकारी एन व्यंकटराव उर्फ मुर्ती याला आज माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. त्यांना छत्तीसगड मधील राजनंदगाव जिल्ह्याच्या पोलिसांनी अटक केली. ते महाराष्ट्रातील देवरी येथून राजनंदगाव येथे येत असताना त्यांना अटक करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडे 23 डिटोनेटरर्स आणि नक्षलवादाशी संबंधीत काही कागदपत्रे सापडली अशी माहिती दुर्ग रेंजचे पोलिस महानिरीक्षक जी.पी. सिंग यांनी दिली.

मुर्ती हा मुळचा आंध्रप्रदेशातील पुर्व गोदावरी जिल्ह्याचा रहिवासी आहे. तो हैदराबाद येथील राष्ट्रीय जिओफिजीकल संस्थेत वरीष्ठ तांत्रिक अधिकारी या पदावर कार्यरत होता. महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवरील नक्षलवाद्यांना विविध प्रकारची स्फोटके पुरवण्याचे काम तो करीत होता. नक्षलवाद्यांना बाह्य भागातून मदत करण्यासाठी जे नेटवर्क चालवले जाते त्यातील तो एक महत्वाचा दुवा होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नुकत्याच अटक करण्यात आलेल्या काही नक्षलवाद्यांकडून पोलिसांनी जी माहिती मिळवली आहे त्यात मुर्तीविषयी पोलिसांना महत्वाची महिती मिळवली होती. त्यानंतर पोलिस त्याच्या हालचालींवर पाळत ठेऊन होते. आज त्याला रंगेहाथच पकडण्यात आले. आपण 1980 पासून माओवादी तत्वज्ञानाचे समर्थक आहोत आणि या चळवळीत काम करीत आहोत अशी कबुली त्याने पोलिसांना दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)