तोगडिया राजकीय पक्ष स्थापन करणार

जोधपूर: आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रविण तोगडिया यांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये आपल्या पक्षाकडून बहुतेक सर्वच जागांवर उमेदवार उभे करण्यात येतील, असे तोगडिया यांनी सांगितले. राजकीय पक्ष स्थापन करण्याची तयारी यापूर्वीच सुरु झाली आहे आणि आपल्या पक्षाच्या नावाची घोषणा लवकरच केली जाईल, असे तोगडिया यांनी सांगितले.

जोधपूरच्या एक दिवसाच्या दौर्यावर आले असता तोगडिया यांनी भाजप नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर टीका केली. हे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. देशातील शेतकरी, कामगार, युवक आणि उद्योज हे या सरकारच्या धोरणांना कंटाळले आहेत. देशातील लोकांना पर्याय हवा आहे. हे लक्षात घेऊन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय आपण घेतला आहे, असे ते म्हणाले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)